देवीचे स्थान हे देवराईत आहे त्यामुळे येथील परिसर सुंदर आहे.देवीची मुर्ती चर्तुभूज असुन साधारन दोन फुट उंच आहे.सध्या ही मुर्ती खुपच भग्न झाली आहे.शेजारीच देवीची लाकडी मुखवटा पुजला आहे.मुर्तीच्या शेजारी अजुन एक तांदळा आहे.या देवीला अनेक भाविक घंटा अर्पन करतात.तसेच अनेक देवतांचे मुखवटे दिसुन येतात.साधारन फेब्रुवारीमध्ये या देवीची यात्रा यावेळी आजबाजुची अनेक गावातील लोक दर्शनासाठी येतात.या देवीचे बागलवाडीत पन स्थान आहे.तसेच नवरात्रात मध्ये अनेक भावीक या मंदिरात अवश्य भेट देतात.पावसाळ्यात जर पाण्याचा प्रवाह जर जास्त असेल तर या मंदिराकडे जाता येत नाही.असे हे काळम्मा देवीच जागृत स्थानाला अवश्य भेट द्या व येथील परिसर सुशोभीत ठेवा हि विनंती.