उजळाई देवी । Ujalai Devi
करवीरच्या पूर्व द्वाराची रक्षक देवता उज्वलंबा देवी अर्थात आई उजळाई देवी.श्री महालक्ष्मी ने देवीची नियुक्ती केली आहे.देवीचे स्थान हे निसर्गरम्य ठिकाणी आहे.देवीच्या शेजारीच उज्वलतीर्थ आहे.करवीर महात्म्य अध्याय 39 मध्ये उजळाई देवी ची कथा येते ती अशी एक पापी शुद्राला पापमुक्त होण्यासाठी मुनीं नी त्याला हातात काळे तिळ घेऊन करवीर क्षेत्रास जाण्यास व तेथील तीर्थस्थान करण्यास सांगितले.ज्यावेळी हे तीळ पांढरे होतील त्यावेळी तो पापमुक्त होशील असे ते मुनी म्हणाले त्याप्रमाणे हातात तिळ घेवून तो करवीर क्षेत्री आला व तीर्थात स्नान करूत चालला पण कुठेही तीळाचा रंग बदलला नाही अखेर तो उज्वलतीर्थावर आला व तिथे स्नान केले आणी तात्काळ ते तीळ पांढरे झाले तेव्हा त्याने पापमुक्त झाल्याच्या आनंदात उजळाई देवीची मनोभावाने पूजा केली.उजळाईदेवी नैसर्गिक शिळे खाली विराजमान आहे.देवीचा निराकार तांदळा आहे तसेच मूर्तीच्या शेजारी एक फूट देवीची मूर्ती असून दोन्ही मूर्तींना शेंदूर लावला आहे.देवीच्या शेजारी असलेला पाण्याचा स्त्रोत याला करवीर महात्म्य मध्ये वरूणा ( वारणा नदी) असा उल्लेख आहे ही नदी गांधीनगर परिसरामध्ये पंचगंगेला मिळते.सोमवार व शुक्रवार व नवरात्रामध्ये असंख्य भाविक देवीच्या दर्शनाला येतात.कोल्हापूर बसस्थानकापासून देवीचे मंदिर हे साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे.येथील वातावरन हे सुंदर आहे.
देवीचा तांदळा व मूर्ती
देवीच्या शेजारी असलेले महादेव लिंग
उज्वलतीर्थ