तुमजाई देवी । Tumjai Devi
श्री केदार विजय या ग्रंथामध्ये तुंगभद्रा देवी म्हणून उल्लेख आहे.हीच देवी तुमजाई.सांगरूळ फाट्यापासून अवघ्या दोन तेतीन किलोमीटर अंतरावर ही देवीचे स्थान आहे तर कोल्हापूर पासून साधारन अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे. देवीचे मंदिर हे डोंगरावर असल्यामुळे गावातून आपल्याला चालत जावे लागते. काही अंतरावरच एक छोटा डँम आहे.डँम पार करून झाल्यानंतर मंदिराला जाण्यासाठी पायवाट लागते.जाताना डेरेदार असे एक आंब्याचे झाड लागते. त्यानंतर मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्यांचे सुरुवात होते. काही वेळेतच आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो.मंदिराची बांधणी ही आताच्या काही वर्षातील आहे,मंदिराच्या प्रवेश दाराबाहेर तुमजाई देवी असा फलक दिसतो. मुख्य मंदिरामध्ये सारख्याच उंचीच्या दोन मुर्ती दिसुन येतात.साधारन दोन ते अडीच फुट मुर्तीची उंची आहे.दोन्ही मुर्तीच्या मध्ये श्री गणरायाची सुंदर अशी मुर्ती आहे.देवीला नवसाचे पाळने बांधलेले आपल्याला दिसतात.मंदिराच्या आजबाजूस वनराई असल्यामुळे पावसाळ्यामध्ये व हिवाळ्यामध्ये येथील वातावरन सुंदर असते. मंदिराच्या पाठीमागे उभे खडक आहेत.पन्हाळा येथील बांदेवाडी या गावातील जशी अस्ती स्तंभाची रचना आहे त्याच प्रकारे येथे सुद्धा असे खडक पाहायला मिळतात.हे खडक एकमेकावर रचलेले आहेत.मंदीराच्या पाठीमागेच दगडामध्ये कोरलेली छोटी गोल पाण्याची टाकी आहे.निसर्ग व मंदिराची अनुभूती घेण्यासाठी कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर अवश्य पहावे.
श्री तुमजाई देवीची मूर्ती
श्री तुमजाई देवीचे मंदिर
मंदिराच्या पाठीमागील असलेले उभे खडक