सातेरी देवी । Sateri Devi
कोल्हापुरातील सातेरी येथील महादेवाचा डोंगर सर्वांच्या परिचयाचा आहे परंतु त्याच डोंगरांमध्ये श्री सातेरी देवीचे मंदिर आहे हे अजून सहसा माहिती नाही,सातेरी देवीच्या नावावरूनच या डोंगराला सातेरी चा डोंगर म्हणतात.देवीचे मंदिर महादेवाच्या मंदिराच्या जाताना उजव्या बाजूला लागते. आजूबाजूला मोठी झाडे आहेत.झाडांच्या खाली आपनास विरगळी पहायला मिळतील.मंदिरामध्ये साधारन एक फुटी देवीचा तांदळा आहे व शेजारी इतर देवतांचे तांदळे आहेत.देवीला नवसाचे पाळने बांधलेले आपल्याला दिसतात त्याचप्रमाने देवीला कोल्हापुरी चप्पला ही वाहतात.महादेवाला जाताना या देवीला नक्की जावे.कोल्हापुरातून मंदिरासाठी जाण्यासाठी बालिंगा फाटा – कसबा बीड – धोंडेवाडी- शेपेकरवाडी हा मार्ग आहे.कोल्हापूर पासुन हे अंतर 40 – 45 किलोमीटर आहे.निसर्ग व मंदिराची अनुभूती घेण्यासाठी कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर अवश्य पहावे.
सातेरी देवीला वाहिलेल्या कोल्हापुरी चपला
मंदिर शेजारी असलेली वीरगळ
सातेरी मंदिराची बाहेरील बाजू