सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इ.स १६४५ साली झाला.औंधच्या यमाई चे दुसरे नाव संताई या देवीच्या नावावरून त्यांना संताजी हे नाव ठेवण्यात आले.एक वेळ आशि होती राज्य नव्हते, खजाणा नव्हता सैन्य नव्हते त्या वेळी सरसेनापती संताजीनी स्वराज्याची पुर्न बांधनी केली व मराठ्याच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला.मुघलांची आर्थिक शारीरिक व मानसिक हानी करणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठ्याच्या इतिहासातील एक पराक्रमी वीर होते.सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मृत्यू १६ जून १६९७ साली झाला.कुरुंदवाड घाट येथे पंचगंगा - कृष्णा नदीच्या संगमावर संताजी घोरपडे यांची समाधी आहे.हि समाधी उघड्यावर वर आहे तरी लवकर या समाधीचे संवर्धन व्हावे हि विनंती.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - सांगली फाटा - अतिग्रे - तमदलगे - शिरोळ - कुरुंदवाड येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल
काही महत्वाच्या गोष्टी
१..हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.स्मारकाच्या शेजारी सुब्रम्हणेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराच्या बाहेर एक छोटे होल आहे यातून फुंकर मारल्यावर शंखनादा सारखा आवाज होतो हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
३.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.