करवीर तृतीयदुर्गा – श्री पद्मावतीदेवी | Padmavati
करवीर क्षेत्राची प्रमुख देवता श्री करवीर निवासनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) इतकाच मान श्री पद्मावती देवीला आहे.पद्मावर्त राजाच्या कारकर्दीतील वसाहतीला पद्मालय असे नाव होते.पुर्वी पद्माळे नावचे तळे होते.ते तळे आता अस्तित्वात नाही.येथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्वर्या करवून पितृद्रोहाचे पाप नष्ट केले.पापाचा नाश करनारे हे स्थान आहे.शिंपी व जैन समाजातील अनेक मंडळी देवीचे भक्त आहेत.सदर देवीची मुर्ती अडीच फूट उंचीची आहे.या ठिकाणी श्री विष्णू,नाईकबा,नागराज,हनुमान,सटवाई देवी,गजेंद्रलक्ष्मी,श्री गणेश,अगस्तीमुनी,लोपामुद्रा इ.परिवार देवता आहेत.या देवीचे स्थान जयप्रभा स्टुडिओ नजीक मंगळवार पेठेत आहे.या देवीच्या नावाने येथील एक मंडळ आहे.जय पद्मावती तरूण मंडळ.दरवर्षी येथील गणेशाची मुर्ती ही आकर्षक असते.