न्यू पॅलेस
कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारण ३ किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा हि प्राचिन संस्थान कालीन वास्तू आहे.१८७७ साली करवीर संस्थानचे ४ थे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये या राजवाड्याची उभारणीला सुरवात झाली. इ.स. १८८४ मध्ये या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले.प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मन्ट यांनी न्यू पॅलेसची रचना केली.युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे.न्यु पँलेस परिसरात तलाव,राखीव जंगल तसेच जंगलामध्ये हरिण,मोर यांसह इतर प्राणी आहेत.न्यू पॅलेसमध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे.३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनी या राजवाडयातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून सूरू करण्यात आले.