मुक्तांबा म्हणजे त्रिरूपा अंबा,रूपत्रायात्मिका शक्ती,महालक्ष्मी,महाकाली आणि महासरस्वती ही तीनही रूपे जिच्या ठायी एकवटली आहेत.देवी मुक्तांबिका आपणाला संसारचक्रातून मुक्त करून धनधान्य,सुखसमृद्धी व ऐश्वर्य देते.मूकांबा देवीचे मूळस्थान कर्नाटकामध्ये ‘कोल्लूर’ नावाने प्रसिद्ध आहे.येथे मूकासूर नावाचा एक अत्याचारी दैत्य राहात होता.त्याने कोलमहर्षीच्या तपाचरणात विघ्न आणण्यास आरंभ केला,तेव्हा त्यांनी शक्तीमातेची करूणा भाकली.तेव्हा त्याठिकाणी गौरीमाता प्रकट झाली व तिने मूकासुराचा वध केला.त्यामुळे ती ‘मूकांबा किंवा मूकांबिका’ या नावाने विख्यात झाली.मंगळवार व शुक्रवार ही देवीचे वार आहेत.नवरात्रा मध्ये नऊ दिवस विविध प्रकारे पुजा केली जाते.पहिल्या दिवशी साधी पुजा बांधण्यात येते.त्यानंतर अन्नपूर्णा,झाडीतली, फळातील,कमळातील,केवड्याच्या बनातली,हातातून गंगा सोडत असलेली,धबधब्यातील अश्या नऊ पुजा रूपात पुजा बांधण्यात येतात. मुक्तांबा देवीची दीड फूट उंचीची काळ्या पाषाणाची बैठी मुर्ती आहे.मुर्तीच्या दोन्ही बाजूस दोन हत्तींनी देवीच्या मस्तकावर चवर्या धरल्या आहेत.देवीच्या शेजारी काळभैरव व भैरवनाथ या परिवार देवता आहेत.देवीचे स्थान हे साठमारी च्या मागे विवेकानंदवाचनालय वास्तु पाशी आहे.