आज अश्विन शुद्ध पंचमी आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबुली पंचमी म्हणून ओळखला जातो. महालक्ष्मी (अंबाबाई)ने याच दिवशी कोल्हासूराचा वध केला. त्यावेळी तिने वर दिला की दरवर्षी मी तुझ्या नावाने कोहळा बळी देईन आणि या नगराला तुझे नाव असेल. पुढे कामाक्ष नावाच्या कोल्हासुराच्या नातवाने कपिल मुनींकडून योगदंड मिळवला. त्याच्या प्रभावाने त्याने महालक्ष्मी सह सर्व देवांचे रूपांतर बक-यांमध्ये केले. हे कळताच त्र्यंबुलीने कामाक्षाचा वध केला आणि सर्व देवांची सुटका केली. पण ते त्र्यंबुलीचे आभार मानायचे विसरून गेले त्यामुळे त्र्यंबुली रागाने शहरा बाहेर टेकडीवर जाऊन बसली तिची समजूत घालायला स्वतः महालक्ष्मी तिथे गेली व आजही तो भेटीचा सोहळा होतो. या भेटी करताच अंबाबाई आज गजारूढ रूपात सजली आहे.
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः