आज अश्विन शुक्ल द्वितीया अर्थात 8 ऑक्टोबर 2021 आजच्या दिवशी करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची माहेश्वरी रूपातली अलंकार पूजा साकारण्यात आली आहे माहेश्वरी अर्थात शुंभनिशुंभ वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी भगवतीच्या सहावी अर्थ प्रत्येक देवाची मूर्तीमंत शक्ती प्रगट झाली त्या शक्तींना मातृका म्हणून ओळखले जाते या मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी भगवान शंकर हे सृष्टी क्रमामध्ये संहाराचे दैवत. संहार हा वाईट नसतो जे निर्माण होते ते कधी ना कधी नष्ट होते आणि जुने नष्ट झाल्याशिवाय नव्या निर्मितीला जागा उरत नाही तेव्हा सृष्टी चक्रामध्ये जितके महत्त्वाचे स्थान निर्मितीला केव्हा पालनाला आहे तेवढेच महत्त्वाचे स्थान संहाराला आहे. भगवान शंकर कधी दैत्यांना वरदान देऊन देवांच्या दूर्गुणांचा संहार करतात तर कधी भक्तांना अभय देऊन त्यांच्या संसार चक्राचा शेवट करतात अशा या भगवान शंकरांची मूर्तिमंत शक्ती म्हणजे भगवती माहेश्वरी. हातामध्ये भगवान शंकरा प्रमाणेच त्रिशूल अक्षमाला अशी आयुधे, नंदी वाहन, माथ्यावरती चंद्रकोर जटामुकूट, कपाळावर त्रिनेत्र अशी भगवती माहेश्वरी भक्तजनांच्या समस्त इच्छा पूर्ण करत त्यांच्या वासना वृत्तीचा संहार करते
हि भगवती माहेश्वरी शक्ती आपणा सगळ्यांच्या दुर्गुणांचा क्षय करून आपल्याला सर्व दृष्टीने अधिकाधिक पात्र बनवू दे हीच जगदंबा चरणी प्रार्थना
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः