आज अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा काल नवमीला घट उठले आणि व्रताची सांगता झाली आज नवा दिवस नवी मोहीम साजरी करायची ते सीमोल्लंघनाने सीमोल्लंघन म्हणजे मर्यादा ओलांडून पुढे जाणं ही मर्यादा अर्थातच सद्गुणांची नव्हे तर आपलं सामर्थ्य ओळखून नवं काहीतरी मिळवण्याच्या हेतूने आपणच घालून घेतलेल्या बंधनांना ओलांडून पार जाणा म्हणजे सीमोल्लंघन आणि हे नव्याने सीमा ओलांडून पुढे जाणे शुभदायक आशादायक असावं यासाठी आज देवादिकांच्या साक्षीने सीमा ओलांडली जाते सत्य संकल्पाचा दाता ईश्वर अशी एक उक्ती प्रसिद्ध आहे यालाच अनुसरून आपण ठरवलेल्या नव्या ध्येयाच्या प्राप्तीच्या प्रवासाला भक्तांना शुभेच्छा द्याव्यात म्हणून स्वतःला जगदंबा आज रथावर विराजमान ही जगदंबा रथारूढ होऊन भक्तांना जणू आशीर्वाद देते जे जे मनी इच्छा कराल ती ती पूर्ण करेल फक्त माझ्या वरती अखंड श्रद्धा आणि मनामध्ये आपण ठरवलेल्या वाटेचा परिणाम पाहण्याचे धैर्य या दोन गोष्टी असू द्या, मनामधला अहंकार रुपी रावण आधी जाळून भस्म करा रघु राजाप्रमाणे कर्तव्याच्या पूर्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवा पांडवांप्रमाणे योग्य वेळेची वाट बघून आपली शस्त्रं धारण करा म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रसंगात या जुंपलेल्या रथा सह मी स्वतःतुमच्यासोबत असेल आई जगदंबेचा हाच आशीर्वाद या रथारूढ रूपातून आपणा सर्वांना मिळो आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो याच विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः