लक्षतीर्थ । Laxtirth
कोल्हापूर पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर लक्षतीर्थ आहे. मंदिराच्या आजबाजूला शेतीवाडी असल्यामुळे येथील परिसर सुंदर आहे.लक्षतीर्था मध्ये सध्या खुप मोठी कमळे आपल्याला पहायला मिळतात.लक्षतीर्थाचे महात्म्य असे ज्याप्रमाणे दक्षिण मानस तिर्थामध्ये कोटीतीर्थ श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे उत्तर मानस तिर्थामध्ये लक्षतीर्थ चा महिमा श्रेष्ठ आहे.या मंदिरात लक्षेश्वर नावाचे शिवलिंग आहे व शेजारीच आपल्या लक्षतीर्थ तलाव दिसून येईल. लक्षतीर्थात स्नान केल्याने एक लक्षतीर्थ स्नांचाचे फळ मिळते.पूर्वी या तिर्थाचे नाव विमुक्ततीर्थ होते व येथील लिंगाचे नाव विमुक्तेश्वर होते या ठिकाणी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ने ज्याप्रमाणे कोटीतीर्था वर असंख्य दैत्यांचा संहार केला त्याच प्रमाणे इथेही लक्ष दैत्यांचा संहार केला व जगदंबेच्या हातून त्यांचा मृत्यू झाल्याने दैत्य मुक्त झाले म्हणून येथील तिर्थाला लक्षतीर्थ येथील लिंगाला लक्षेश्वर हे नावे पडले. प्राचीन असे हे मंदिर आहे मूळ मंदिर आहे तसेच ठेवून मंदिराची इतर डागडुजी केली आहे.मंदिरामध्ये लक्षेश्वराचे चौकोनी आकारचे लिंग व शेजारी श्री गणरायाची सुबक मूर्ती पहायला मिळेल.मंदिराच्या बाहेर मारूतीची मुर्ती आहे.महाशिवरात्री व श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची गर्दी असते.सध्या कोल्हापूर मध्ये काहीच तीर्थे शिल्लक राहिले आहेत कोल्हापूरातील नागरिकांना इतकीच विनंती आहे की येथील ही प्राचीन तीर्थे आहे तशीच व्यवस्थित राहू देत.कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर व येथील तिर्थ अवश्य पहावे व येथील परिसर अबाधित ठेवावा.
Related