करवीर चतुर्थदुर्गा – श्रीप्रत्यंगिरादेवी फिरंगाई | Firngai
प्राचीन काळी करवीर क्षेत्री राक्षसांनी थैमान घातल्यावर लोक भयभीत झाले.पण खुद्द देवांनाही त्यांचा त्रास होवू लागला.तेव्हा श्री अंबाबाईने करवीर क्षेत्राचे रक्षन केले.तेव्हा देवी प्रत्यंगिरा ही महालक्ष्मीच्या साहाय्यास धावून आली.देवीचे स्थान हे शिवाजी पेठेत आहे.चैत्री पौर्णिमेस या देवीचा वार्षिक उत्सव असतो.या देवीची नित्य पुजाअर्चा गुरव मंडळी करतात.या देवीला पीठ,मीठ,हळद,तेल अर्पण करतात.या दिवीचे प्रत्यंगिरा,प्रियांगी ही पन नावे आहेत.प्रियांगिचे बोली भाषेत प्रियंगाई व पुढे फिरंगाई असे नाव देन्यात आले.देवीचा 10 इंच उंचीचा शेंदूर लावलेला तांदळा आहे.कानकोबा व खोकलोबा या परिवार देवता आहेत.खोकलोबा देवास पीठ- मीठ दहिभात ठेवल्याने खोकला जातो.व कोनकोबाची पुजा करून तेथील देवाचे तीर्थ व अंगारा लावल्याने कानाचे रोग नष्ट होतात असा भक्ताचा विश्वास आहे.पुर्वी मंदिराशेजारी तळे होते