चंदगड हा तालुका ( 15° 55′ उत्तर, 74° 10′ पूर्व ) कोल्हापूरच्या दक्षिणेस 135 किलोमीटर अंतरावर आहे तसेच बेळगाव पासून 25 किलोमीटर अंतर आहे.पुरातन रवळनाथ मंदिर येथे प्रसिद्ध आहे तसेच मंदिराशेजारी फारशी शिलालेख आहे येथील यात्रा फेब्रुवारीमध्ये भरते.चंदीगड मध्ये एक गडी होती ती आता अस्थित्वात नाही.फणस,काजू,भात,बटाटा अशा अनेक पिकांसह औषधी वनस्पती या परिसरात या परिसरामध्ये आढळतात,निसर्गसंपन्न असा हा तालुका आहे.चंदगड तालूकामध्ये 156 गावांचा समावेश आहे.