भुदरगड तालुक्यातील गारगोटी पासून अवघ्या तेरा ते पंधरा किलोमीटरवर अंतरावर असणारे शेणगाव हे वेदगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे.येथे प्राचीन असे श्री दत्तात्रयांचे मंदिर आहे.नरसोबाच्या वाडी पासून टेंबे स्वामी ज्यावेळी माणगाव येथे जात असेल त्यावेळी श्री टेंबे स्वामी या गावी येऊन अवश्य येथे विश्रांती घेऊन जात असत.टेंबे स्वामी यांच्या पदस्पर्शाने या मंदिराला विशेष असे महत्त्व आहे.बाळ भटजी पैठणकर यांनी मंदिराची स्थापना केली असे म्हणतात.
दत्त जयंती आणि गुरुद्वादशी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात तसेच गुरुवारी आणि पौर्णिमेला ही भाविकांची गर्दी असते.साधारण 1 फुट उंचीची श्री दत्त्तात्रयांची एक मुखी मूर्ती सहा भुजांची आहे.अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री कार्तिक स्वामींची मूर्ती आहे.प्रदक्षिणा मार्गात पण विविध देवतांच्या मूर्ती आहेत.यामध्ये श्री खंडोबा श्री ज्योतिर्लिंग श्री शनिदेव श्री शिव शंकर श्री गणराया अष्टभुजा देवी विठ्ठल-रुक्मिणी व हनुमान तसेच राम पंचायतन आहे. मंदिराच्या खाली घाट आहे हा घाट पाहिला की नरसोबाची वाडी व प्रयाग येथे आठवण येते.
मूळ मंदिर आहे तसेच ठेवून मंदिराची इतर डागडुजी करण्यात आले आहे.पाण्यामध्ये असणारे महादेवाचे मंदिराचे नव्याने मंदिर उभारण्यात येत आहे काहीच दिवसात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल.मंदिराच्या सभोवताली झाडे असल्यामुळे येथील परिसर हा खूप सुंदर आहे.आपाजी नारायण पाटील शके 1818 म्हणजेच 1896 साली येथील घाटाची निर्मिती केली असा उल्लेख एका दगडी शिळे मध्ये आपल्याला दिसतो.पावसाळ्यामध्ये येथील पुराचे पाणी वाढल्यास मंदिर पाण्याखाली जाते. कोल्हापूर पासून कळंबे – इस्पुरली – तुरंबे – आदमापूर – गारगोटी – आकुर्डे मार्गे आपण शेणगाव येथे पोचू शकतो.कोल्हापूर पासून साधारण 50 ते 54 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.या मंदिराला येथील परिसराला अवश्य भेट द्यावी ही विनंती व येथील परिसर स्वच्छ ठेवावा.