सरसेनापती धनाजी जाधव यांनी छ.संभाजी महाराज व छ.राजाराम महाराज यांच्या काळामध्ये स्वराज्यासाठी योगदान दिले आहे.छ.संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची धुरा वाहिली. संताजी मरण पावल्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता. शिव काळामध्ये अनेक धुरंधर योद्धे कोल्हापुर जिल्ह्यात होऊन गेलेत अशीच एक जोडी ती म्हणजे सरसेनापती धनसिंग उर्फ धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांची आहे.या दोघांची छबी सुद्धा पाण्यात दिसली की मोगलांचे घोडे पाणी पिण्यास दचकत असत.सरसेनापती धनाजी जाधव कोल्हापुरातील मोहिमेवरून परत येत असताना,वारणा नदीच्या काठी वडगाव येथे मरण पावले.त्यांचे स्मारक पेठवडगाव या गावामध्ये आहे.पेठवडगाव या गावामध्ये एक उद्यान तयार केले आहे.या उद्यानाला धनाजी जाधव स्मृती उद्यान म्हणून नाव दिले आहे.याच उद्यानात सरसेनापती धनाजी जाधव यांची समाधी आहे तसेच त्यांच्या पत्नी गोपिकाबाई यांची हि समाधी आहे.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - शिरोली - टोप - संभापूर - पेठवडगाव - येथून स्थानिक लोकांना विचारून पोहचता येईल
काही महत्वाच्या गोष्टी
१..हे ऐतिहासिक ठिकाण आहे यामुळे येथे पर्यटकांनी शांतता राखावी.
२.स्मारकाच्या येथे पार्किग सुविधा आहे.