करवीर नवमदुर्गा – श्री लक्ष्मी | Shree Laximi
लक्ष्मी देवीचे प्राचीन मंदिर कोल्हापुरातल्या छ. शाहू क्लाँथ मार्केट समोर लुगडी ओळीत (जुना हत्ती महाल रोड) महाराष्ट्र शासनाच्या वजन माप कार्यालयाच्या परिसरात आहे.मुर्ती चतुर्भुज आहे.मुर्तीची उंची दिड फुट इतकी आहे.मुर्ती बैठी आहे.मुर्ती शेजारी दगडामध्ये कोरलेले दोन हत्ती आहेत.श्री विष्णु व शक्तीच अखंड रूप म्हणजे श्री लक्ष्मी,संपदा म्हणजे श्री लक्ष्मी,सातवी गुणांची प्रेरक म्हणजे श्री लक्ष्मी,माया शक्ती आणि लक्ष्मीचा अखंड रूप म्हणजे श्री लक्ष्मी ही भक्तांना पावते असे म्हणतात.