करवीर पंचमदुर्गा – श्री कमलजादेवी | Kamalaja
भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुराशी युद्ध आरंभले तेव्हा आपल्या योगिनी गणांसह महागौरी सिंहावर बसून युद्धास आली आणि तिने दुर्गासुराचा नाश केला म्हणून ब्रह्मदेवांनी देवीची कमल पुष्पाने महापूजा केली तेव्हापासून ही गौरी कमळाच्या नावाने प्रसिद्धी झाली. सदरची मूर्ती कमळावर बसलेली आहे. मूर्तीची उंची दोन फूट आहे.देवीचे स्थान हे अपना बँकेजवळ,उभा मारूती चौक,शिवाजी पेठ कोल्हापूर येथे आहे. श्री नृसिंह,विठ्ठल-रुक्मिणी,श्री महादेव इ. परिवार देवता आहेत.