प्राचीन काळी राक्षसांनी करवीर क्षेत्री उच्छाद मांडल्यावर हैराण झालेल्या देवांनी श्री महालक्ष्मीची आळवणी केली.तेव्हा राक्षसांचा बीमोड करण्यासाठी महालक्ष्मी सर्व चामुंडासह सैन्य घेऊन धावली.त्यावेळी श्री महालक्ष्मीच्या साहाय्यासाठी आलेल्या अनेक देवींपैकी एकवीरा ही एक देवी मानली जाते.एकवीरा देवता ही जमदग्नी ऋषींची पत्नी व परशुरामाची माता असून देवीशक्तीतील प्रधान देवता आहे.अनेकांची कुलदेवता ही आहे.या देवीचा स्वयंभू तांदळा असून जमिनीखाली सुमारे एक फुट खोल आहे.त्यावर पाट ठेवून मुखवटा ठेवला जातो व त्यावर देवीची सुंदर अशी पुजा केली जातेे.या देवीला यमाई देवी म्हणूनही ओळखले जाते.या देवीची दररोजची पुजा श्री गुरव यांच्याकडून होते.अजुन एक विशेष म्हणजे या देवीच्या सानिध्यात श्री दत्तगुरू निवास करतात.मंदिरासमोर सुंदर अशी दिपमाळ आहेे.देवीचे स्थान हे दत्तभिक्षालिंग काँमर्स काँलेज आझाद चौकामध्ये आहे.