भुदरगड तालूक्यामध्ये टिक्केवाडी हे गाव आहे.कूर गावापासुन साधारन 4 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.टिक्केवाडी हे शेतीप्रधान गाव आहे.या गावामध्ये जागृत श्री अष्टभूजाई देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या आजबाजूला घनदाट जंगल आहे त्यामुळे येथील परिसर सुंदर आहे.सध्याच असलेले मंदिर हे गावापासुन टेकडीवर आहे.ग्रामस्थांच्या वतीने मंदिराची नव्याने बांधनी झाली आहे.मंदिराच्या बाहेर तुळशी वृंदावन व दोन दगडी दिपमाळ आहेत.दिपमाळेच्या खाली गणेशाची मुर्ती व इतर देवतांचे तांदळे आहेत.
Previous
Next
मंदिराचा सभामंडपात दोन द्वारपाल आहेत.मुळ मंदिराचा गाभारा आहे तसा ठेवून मंदिराची बांधणी केली आहे.देवीची मुर्ती साधारन 2.5 ते 3 फुुट आहे.देवीचे 8 हात असल्यामुळेच दिवीला अष्टभुजाई असे म्हणले जाते.मंदिराच्या बाहेरच्या बाजूस एक जिंवत पाण्याची स्त्रोत आहे.मंदिर हे देवराईत असल्यामुळे येथील वातावरन प्रसन्न आहे.देवीच्या दर्शनासाठी दर मंगळवारी व आमावस्येदिवशी अनेक भाविक मंदिराला भेट देतात.फेब्रुवारी महिन्याच्या माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी देवीचा जागर व दुसऱ्या दिवशी देवीची यात्रा भरते.देवीच्या जागरा दिवशी रात्री बारा वाजता देवीची पालखी मंदिराच्या बाहेर वाजत गाजत निघते.मंदिराच्या बाहेर सासनकाठ्या नाचवत मंदिराच्या भोवतीने पाच प्रदक्षिणा काढल्या जातात.यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून रात्री साडेबारा वाजता बळीची पाच बकरी प्रत्येकी एका घावात तोडली जातात आणि मगच गावकऱ्यांना आपल्या नेवेद्याचा मान दिला जातो.
मंदिराच्या बाबतीत व देवीच्या बाबतीत ग्रामस्थांच्या वतीने एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वीच्या काळी एक व्यक्ती डोंगरावरील जंगलामध्ये असणाऱ्या देवीची पूजा करण्यासाठी रोज नित्यनेमाने जात असे.त्याची ही सेवा अशीच अखंड सुरू होती.काही वर्षांनंतर म्हातारपणामुळे त्या व्यक्तीला जंगलातील डोंगरावर देवीची पूजा करण्यासाठी जाणे शक्य होईना.तेव्हा त्यांनी देवीला साकडे घातले.देवीने प्रसन्न होऊन त्याला त्याची इच्छा विचारली तेव्हा त्याने म्हातारपणामुळे देवीची पूजा अर्चा करण्यास डोंगरांमध्ये यायला जमत नसून देवी तू पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये येऊन वास्तव्य कर जेणेकरून मला तुझी पूजा अर्चा रोज करता येईल.देवीने त्याचे हे म्हणने मान्य जरूर केले पण त्याला एक अट देखील घातली.ती अट अशी कि मी तुझ्या मागोमाग पायथ्याकडे जरूर येईन परंतु जर तू मागे पाहिलेस तर मी त्याच ठिकाणी वास्तव्य करीन.या अटी प्रमाणे ती व्यक्ती डोंगरावरून खाली उतरू लागली व त्याच्या पाठोपाठ देवी एका दगडी शिळेच्या स्वरूपात त्याच्या मागोमाग खाली येऊ लागली.पण काही वेळानंतर गावाच्या अलीकडेच काही अंतरावर त्या व्यक्तीने अनावधानाने मागे वळून पाहिले आणि ती शिळा तिथेच थांबली व या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना झाली
हे तेच अष्टभुजाई देवीचे देवस्थान व मंदिर.अष्टभुजाई देवी ही टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत आहे तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक देवीला न्यायदेवता म्हणून ओळखतात.नवरात्र उत्सवात अनेक भाविक येथे मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरात भेट देतात.भुदरगड परिसरात असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.
🛵 कसे जाल ? 🚗
कोल्हापूर पासुन अंतर – 50 किलोमीटर
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – इस्पुर्ली – शेळेवाडी – बिद्री – मुदाळतिट्टा- कुर – टिक्केवाडी