छ.शिवाजी विद्यापीठ । Ch.Shivaji Univercity
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बोलके व्यासपीठ म्हणजे, कोल्हापूर १९६३ या सालात दिवंगत माननीय श्री. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्यामधे पुढाकार घेतला. हया विद्यापीठाच्या सीमांतर्गत, सांगली, सातारा आणि सोलापूर यांचा समावेश होतो.१००० एकराच्या प्रशस्त वास्तुचे हे विद्यापीठ म्हणजे, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आघाडीवरील एक लक्षणीय घोडदौड आहे. प्रमुख कार्यालयाच्या बरोबरीने बॅ. कर्देकर ग्रंथालय, मानव्यशाखा इमारत, जीवशास्त्र इमारत, सांस्कृतिक सभागृह तसेच महिला व पुरूष विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल हे सारे दिमाखदारपणे उभे आहे. पदवीदान समारंभाकरिता एक खास सभागृह आहे.मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हे नयनरम्य दृष्य होय. नानाविध झाडे, वेली, फुले, फळझाडे यांनी विद्यापीठाचे आवार हिरवेगार आहे. परिक्षा सुकर होण्यासाठी, लेखा विभाग, स्टोर कंट्रोल आणि निधी विभाग हे व्यवस्थापनातील भाग कार्यरत असतात. कुलपती, कुलगुरू, विद्यार्थी प्रतिनिधी, शासकीय प्रतिनिधी इ. हया व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवतात.
Related