छ. शिवाजी महाराज आणि छ. ताराराणी रथोत्सव

 महाराष्ट्र भूमीचं जे वैभव आज टिकून आहे ते छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने. आज आपण जे सद्गुण आनंदाने आणि अभिमानाने मिरवतो त्या सगळ्याचे मूळ प्रेरणास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! श्रींची इच्छा म्हणून निर्माण केलेलं हे स्वराज्य महाराजांच्या पश्चात सिंहासनाधिष्ठीत झालेल्या प्रत्येक छत्रपतींनी त्यांच्या सर्व शिलेदारांनी प्राणपणाने जपले नुसते जपलेच नाही तर वाढवले देखिल. याच मालिकेतील एक रत्न म्हणजे महाराणी ताराबाई सरकार.जुल्मी औरंग्याची कबर सांगून दक्षिणेत खणणारी ही रामराणी भद्रकाली! अशा समरकुशला साम्राज्ञीने स्थापन केलेले हे करवीर संस्थान.

 छत्रपती घराण्याच्या करवीर शाखेचा मुकुटमणी म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. चौफेर आणि बहुश्रुत ज्ञानाने सक्षम अशा राजर्षींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या  आणि स्वराज्या बद्दल असलेला अभिमान आणि आदरभाव त्यांच्या चरित्रात ठिकठिकाणी दिसून येतो. हाच अभिमान आणि वारसा आपल्या प्रजेतही रूजावा वाढावा म्हणून शिवराय आणि ताराऊसाहेब या देवतुल्य व्यक्तिमत्वांच्या समारंभांना धार्मिक उत्सवाचे स्वरूप देऊन १९१४ साली महाराजांनी एक रथोत्सव केला. ज्योतिबा यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी चा रथोत्सव संपन्न होत असतो. याच रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराजांनी हा शिवाजी महाराज व ताराराणी सरकारांचा रथोत्सव सुरू केला.

कै. नानासाहेब यादव यांच्या सारख्या जुन्या लोकांनी सांगितलेल्या आठवणी नुसार हा रथोत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक सोहळा नव्हता तर करवीर संस्थानचे एक लष्करी संचलनच असायचे. सर्व शाही लवाजम्यासह होणारा हा रथोत्सव करवीरनिवासिनी च्या रथाच्या मार्गानेच ( भवानी मंडप- मलग हायस्कूल-मिरजकर तिकटी- बिनखांबी गणेश मंदिर- महाद्वार रस्ता- महाद्वार चौकात करवीर निवासिनी कडून आरती स्विकारून पुढे- गुजरी – भावसिंगजी रस्ता- नगारखाना मार्गे पुन्हा भवानी मंडप )प्रवास करतो‌.

 रथोत्सवा दिवशी रात्री आठ वाजता छत्रपतींच्या अंबा देवघरात हुजुर स्वारीच्या म्हणजे महाराज छत्रपतींच्या हस्ते आरती संपन्न होते त्या नंतर चोपदारांच्या ललकारी पाठोपाठ शिवरायांची मूर्ती रथारूढ केली जाते. पुन्हा एकदा महाराज रथाची पूजा करतात आणि रथ भाविकांकरवी ओढून मार्गस्थ केला जातो.

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

आजचा दिवस मात्र थोडा विशेष आहे. ६ मे १९२२ राजर्षी शाहू महाराज अनंतात विलीन झाले. त्या गोष्टी ला यावर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. शंभर वर्षांनंतर देखील आजही आपल्या नगरीचं वैभव राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईवरच आहे तेव्हा यासाठी हे वर्ष आपण महाराजांच्या प्रति कृतज्ञतापर्व संपन्न करूया. १८ एप्रिल ते २२मे२०२२ या काळात महाराजांच्या सुवर्ण स्पर्शाने पावन झालेल्या कला क्रीडा संस्कृती साहित्य अर्थ शिक्षण अशा अनेक कार्यक्षेत्रातील उपक्रमांनी महाराजांना अभिवादन केले जाणार आहे

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top