पार्वती मंदिर वडणगे,कोल्हापुर

करवीर क्षेत्रास दक्षिण काशी म्हटले जाते.करवीर क्षेत्रामध्ये प्रत्येक जीवाला भुक्ती व मुक्ती देण्यासाठी स्वतः काशी विश्वेश्वर आहेत.करवीर क्षेत्री आपल्याला अनेक शिवलिंगे पाहायला मिळतात या सर्व शिवलिंगाची माहिती आपण लवकरच या वेबसाईट च्या माध्यमातून आपन घेनार आहोत.आज महाशिवरात्र तर जाणून घेऊया कोल्हापुरातील शिव – पार्वती या दोन मंदिरांची माहिती.कोल्हापूर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणारे व पंचगंगा नदीच्या काठावर असणारे वडणगे हे गाव शिव व पार्वती या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.अनेक ठिकाणी आपल्याला फक्त शिवाची मंदिरे व त्यामध्ये शिवलिंग पाहायला मिळेल परंतु करवीर या क्षेत्री आपल्याला शिव व पार्वती यांची स्वतंत्र मंदिरे आपल्याला पाहायला मिळतील.प्रथम आपण पार्वती देवी ची माहिती घेणार आहोत

तालुका - करवीर

..................................................

मार्ग - कोल्हापूर - वडणगे

..................................................

गावाचे नाव - वडणगे

..................................................

योग्य काळ - वर्षभर

..................................................

सध्या जिथे वडणगे गाव आहे त्याच्या मुख्य चौकांमध्ये आपल्याला श्री पार्वती देवीचे मंदिर आहे.मंदिरात प्रवेश करताच भव्य अशी प्रवेशद्वार आपल्याला दिसते.मंदिराला प्रवेश करण्यासाठी तीन द्वार आहेत,त्यामध्ये पुरुष व स्त्री यांची स्वतंत्र व या दोन द्वारांच्या मध्ये एक मोठे द्वार आहे.सध्या याद्वारा मधूनच भाविक प्रवेश करतात.स्थानिक बेसॉल्ट खडकामध्ये कमान आहे.कमानी मध्ये सुंदर अशी कलाकुसर आहे.कमानीमध्ये आपल्याला गणेशाची मूर्ती दिसून येते.प्रवेश द्वारा मधून आत गेल्यानंतर आपल्याला भव्य असा सभामंडप दिसून येतो,सभामंडपाच्या दोन्ही बाजूस आपल्याला जुने कोरीव दगडी खांब दिसून येतात. सध्या या खांबावर जुने बांधकाम आपल्याला दिसून येत नाही.डाव्या बाजूच्या खांबा मध्ये आपल्याला कासवामध्ये कोरलेल्या दोन पादुकांचे दर्शन होते.मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीचा दीड फूट तांदळा आहे.याच तांदळ्या वर देवीची पूजा बांधण्यात येते.देवीचे हे मंदिर बेसॉल्ट खडकामध्ये बांधलेले आहे.या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर दुर्गा-सप्तशती या ग्रंथांमधील वर्णन केलेल्या अनेक देवींचे शिल्प आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये शैलपुत्री,ब्रह्मचारिणी,कुष्मांडा,कात्यायणी,स्कंदमाता,चंद्रघंटा,

कालरात्री,महागौरी,दुर्गामाताअशा विविध देवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात.शारदीय नवरात्र,महाशिवरात्र,प्रत्येक

सोमवार या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये येथे भाविक दर्शनासाठी येत असतात.मंदिराच्या बाहेर आपल्याला चार ओवरया पाहायला मिळतात.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.त्यानंतर काही वर्षापूर्वी

ग्रामस्थाच्यावतीने नव्याने मंदिराची उभारणी झाली आहे.मंदिरासमोर सुंदर दगडी दीपमाळ आहे.

शिव मंदिर वडणगे,कोल्हापुर

दिपमाळेपासुन समोरच्याच रस्त्यांमधून आपल्याला शिवमंदिर कडे जायला वाट आहे.थोड्या अंतरावर शिव मंदिर आपल्याला पाहायला मिळेल.त्रंबकेश्वर तलावाच्या काठी वसलेले हे शिवमंदिर प्राचीन आहे.मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला शृंगी व भृंगी हे द्वारपाल आपल्याला दिसतात.मंदिराचे प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम घडवले आहे.मंदिराचा सभामंडप हा नव्याने बांधला असून बारा ज्योतिर्लिंगाचे पेंटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात.मंदिराचा जीर्णोद्धार हा नव्याने काही वर्षांपूर्वी झाला आहे.

सभामंडपानंतर नंदीचे आपल्या दर्शन होते.मंदिराच्या गाभा-याच्या बाहेर श्री गणरायाची संगमरवरी मध्ये साधारण एक फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती आहे.मुख्य गाभारा मध्ये श्री शिवाचे लिंग आपल्याला पाहायला मिळेल.लिंगावर आपल्याला पितळेचा नाग आहे.मंदिराच्या शिखरावर विविध मूर्तींचे दर्शन आपल्याला पाहायला मिळेल.मंदिराच्या बाहेर साधारण सात ते आठ मोठ्या उंचीच्या व काही भग्न झालेल्या विरगळी आपल्याला पहायला मिळतात.प्रत्येक सोमवारी,महाशिवरात्री या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये येथे भाविक येत असतात.पार्वती मंदिर व शिव मंदिर याच्यामध्ये एका चौथऱ्यावर आपल्याला कोंबड्याचे दर्शन होते.महाशिवरात्री मध्ये येथे या कोंबड्याची पूजा केली जाते.या लोककथेबद्दल व प्राचीन अशा करवीर महात्म्य या ग्रंथामधील काही संदर्भची माहिती घेऊया.

कोल्हापूर च्या उत्तर दिशेला वसलेलं पण करवीरच्या क्षेत्र माहात्म्यात महत्त्वाचं स्थान असलेलं गाव अर्थात वडणगे.भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही धरणी.लोककथेप्रमाणे करवीर चा महिमा ऐकून या क्षेत्रांचे दर्शन घ्यायला  स्वतः भगवान विश्वेश्वर माता पार्वती काशी सोडून करवीरात येण्यासाठी निघाले , देवांचा नंदी रंकाळ्यावर पोचला देव आणि माता वडणग्यात राहीले  तोवर कोंबडा आरवला आणि माता पार्वती सह भगवान शंकर जिथे होते तिथेच अर्थात वडणगे गावातच पण वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती रूपात स्थीर झाले. पण करवीर माहात्म्य ग्रंथांत बत्तीसाव्या अध्यायात या क्षेत्राचा उल्लेख उमा  त्र्यंबकेश्वर असा आहे.या क्षेत्राचे माहात्म्य असे की इथे माता पार्वती स्वतंत्र मंदिरात विराजमान  आहे करवीर माहात्म्य ग्रंथांत दिलेल्या कथेप्रमाणे कर्मशर्मा नावाचा एक पंचमहापातक केलेला ब्राम्हण आपल्या बांधवांसह इथे आला त्याने महाशिवरात्री दिवशी उपवास करुन उमा शंकराची पुजा केली बेलाच्या पानांनी पूजा केली व तो सर्वपापांतून मुक्त तर झालाच शिवाय भगवान शंकरांनी त्याला विमानातून कैलासाला नेले. अशा या परमपावन क्षेत्री माता पार्वतीच्या कृपेने सर्व भौतिक सुखं तर शंकरांच्या आशिर्वादाने आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होते

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top