शिरोळ हा ( तालुका 16° 40′ उत्तर 74° 35′ पूर्व ) कोल्हापूर पासून साधारण 48 किलोमीटर अंतरावर आहे.श्री क्षेत्र नृसिहवाडी कडे जाताना हे गाव आहे.अठराव्या शतकाच्या पुर्वार्धात गावाभोवती खंदक व तटबंदी होती व एक लहान किल्ला होता आज त्यापैकी काही अस्तित्वात दिसत नाही.श्री दत्तात्रयाच्या हात कोरला आहे या ठिकाणास भोजपात्र असे म्हणतात.तसेच श्री कल्लेश्वराच जून मंदिर आहे. गावाजवळ श्री दत्त सहकारी साखर कारखाना आहे. शिरोळ गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे कुरंदवाड या गावामध्ये चामड्याचे कोल्हापुरी चपला मिळतात.श्री दत्तात्रयाचे स्थान म्हणजेच श्री क्षेत्र नृसिहवाडी हे या तालुक्यामध्ये येते,दत्त जयंती व गुरुपौर्णिमा या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक येथे दाखल होतात.याशिवाय वास्तुकलेचा उत्तम उदाहरण म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे या तालुक्यात आहे. शिरोळ तालुका मध्ये 54 गावांचा समावेश आहे.