खेडे गावचे महाकाय महाबली हनुमान मंदिर

आजरा गावातून साधणार ७ ते ८ किलोमीटर पुढे आलो असेन तोच मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूस खेडे या गावच्या फाट्याजवळ थोड्या आतमध्ये एक प्रचंड मोठी महाबली हनुमंताची मूर्ती नजरेस पडली.मग काय लगेच आमची गाडी वळली त्या दिशेला.फाट्यावरच ग्रामपंचायत खेडे ता. आजरा जि. कोल्हापूर अशा नावाची दिशादर्शक बाण असलेली पाटी पाहायला मिळाली.फाट्यातून आत जाताच २ मिनिटातच आम्ही पोहोचलो ते महाकाय महाबली हनुमान मंदिरासमोर.खेडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच शेतवाडीमध्ये हे मंदिर आहे.आता मंदिर म्हटले कि सभामंडप कळस आला पण ईथे तसे काही पाहायला नाही मिळत. हे मंदिर म्हणजे चारही बाजूनी मध्यम उंचीच्या सिमेंटच्या भिंती उभ्या असून आतील बाजूस त्यावर पत्र्याचे शेड बनवले आहे.या दोन्हीच्या मधोमध बजरंगबलीची महाकाय मूर्ती उभी आहे.

तालुका - आजरा

..................................................

मार्ग - कोल्हापूर - गारगोटी - उत्तूर - हलेवाडी

..................................................

गावाचे नाव - खेडे

..................................................

योग्य काळ - वर्षभर

..................................................

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

हि मूर्ती साधारण अंदाजे २५ ते ३० फुटाची तरी असावी. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस भिंतीवर श्री राम श्री राम श्री राम राम अशी लिखाण केलेली अक्षरे मात्र लक्ष वेधून घेतात.आम्ही पादत्राणे बाहेर काढून एका छोट्या लोखंडी गेट मधून मंदिर परिसरात प्रवेश केला. प्रशस्त, स्वच्छ व सुंदर असा हा मंदिर परिसर असून बरोबर मधोमध महाबली मारुतीरायाची महाकाय अशी मूर्ती उभी आहे.या मूर्तीचे मुख पूर्णपणे दक्षिण दिशेकडे वळलेले असून ( दक्षिणमुखी मारुती ) मारुतीरायाने डावा हात मूठ वाळलेल्या स्थितीत छातीवर ठेवला आहे व उजव्या हातात गदा पकडली आहे. मारुतीरायाच्या शेजारीची प्रभू श्री. रामचंद्रांची सुंदर अशी उभ्या स्वरूपातील साधारण ५ फुटाची मूर्ती देखील उभी आहे.दोन्हीही मुर्त्यांच्या डोक्यावर छत्र उभे केले आहे.या मंदिर परिसरातील दोन्ही बाजूनी पत्र्याचे शेड मारून उभ्या केलेल्या भिंतींवर अतिशय सुंदर अशा आशयाचे विचार कोरलेल्या चौकोणी फरश्या बसवल्या आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे देखील सुंदर रित्या त्यावर कोरलेली आहेत. हे कोरीव काम व विचार वाचण्यासाठी प्रत्येकाची पावले या परिसरात थोडा वेळ का होईना थांबतातच.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

आम्ही ते सर्व वाचन करून उजव्या बाजूस भिंतीवर असलेला डिजिटल फलक वाचू लागलो त्यावर या मंदिराची मंदिराची संकल्पना व आराखडा साकारणारे योग प्रणेता, सेंद्रिय शेती शिल्पकार आर्यकृषक,आजरा भूषण श्री. मोहन शंकर देशपांडे याचे चित्र होते तसेच संपर्कासाठी खाली काही संपर्क क्रमांक हि लिहलेले होते.त्या बाजूलाच एक दुसरा डिजिटल फलक सुद्धा होता त्यावर मंदिराविषयी लिहलेली माहिती अशी – हे मंदिर खाजगी आहे. श्री समर्थ रामदासांनी अकरा पराक्रमी मारुतींची स्थापना केली.हा मारुती पराक्रमी – आश्वासक नवसाचा आहे. ब्रह्मतेजाच्या नियमांचे काटेकोट पालन करून बांधलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. त्यामुळे आपल्या मनात अनेक प्रश्न येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचे आधुनिक शास्त्रीय परिभाषेत उत्तर दिले जाईल आपले समाधान होईलच आणि आगळा वेगळा आनंद हि होईल – जगण्याचा अर्थ कळल्याने… अशा आशयाची मंदिराची माहिती देणारा तो फलक होता.त्याखाली देखील काही संपर्क क्रमांक नोंद केले होते. ह्या मंदिराचे ईंजिनियर श्री. दत्तात्रय गणेश सोहनी व फरशीवरील अक्षरांचे कोरीव काम श्री. बी. व्ही. ओतारी ( कालिका आर्टस् , गडहिंग्लज ) यांनी केले आहे तर फरशीवर अक्षरबद्ध केलेले विचारधन हे श्री. मोहन शंकर देशपांडे यांच्या निरनिराळ्या पुस्तकांमधील आहे. तशा आशयाच्या माहितीच्या दोन फरशी तेथे बसवण्यात आल्या होत्या.असे हे सुंदर व भव्य असे मंदिर अवश्य पहावे.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top