कोल्हापूर गणेश उत्सव

कोल्हापूरामध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्यात लक्षवेधी ठरत असतो.अनेक सामाजिक उपक्रम राबवत येथील सार्वजनिक मंडळे राज्यात आदर्श निर्माण करतात.कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील एक वेगळी परंपरा आहे.विशेषत पेठा – पेठांमधील मंडळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.गणेशोत्सवात विधायक उपक्रमांत बरोबरच जंगी विसर्जन मिरवणूक यांचे परंपरा देखील इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जपली आहे.घरगुती गणपती विसर्जनाच्या दुसर्या दिवशी पासून सजीव देखावे पाहण्यासाठी रांगा लागतात.कसबा बावडा,शिवाजी पेठ,मंगळवार पेठ येथे सुंदर ऐतिहासिक देखावे सादर केले जातात.अनंत चतुर्थी दिवशी प्रथम मानाचा श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्री च्या मूर्तीचे पूजन होवून विसर्जन मिरवणूकीला सुरवात होते.नेत्रदीपक लेसर च्या प्रकाश झोतामध्ये अनेक मंडळ मिरवणूक मध्ये सहभागी होतात.अनेक तासामध्ये चालणारी हि मिरवणूक शांततेत व उत्सवात पार पडते.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top