शिव सतीच्या प्रेमकहाणी ला जिवंत ठेवणारी खिद्रापूर व यडूर गाव

श्री कोपेश्वर व धोपेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले खिद्रापूर हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. खिद्रापूर परिसरावर अनेक राजघराण्यानी राज्य केले. खिद्रापूर हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यामध्ये येते. महाराष्ट्र व कर्नाटक या सीमेवर आग्नेय दिशेला साधारण 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे.कृष्णा नदीच्या काठावर खिद्रापूर हे गाव वसले आहे,नदीच्या दुसर्‍या तीरावर कर्नाटकातील शहापूर,जुगुळ ही गावे लागतात. खिद्रापूर चे प्राचीन नाव कोप्पम असे होते याचा लिखीत पुरावा कोपेश्वर मंदिराच्या अंतर ग्रहांमध्ये उत्तर भिंतीवर असलेल्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसेच खिद्रापूर हे नाव आदिलशाही सरदार खिदरखान यांच्या नावावरून पडले गेले आहे.खिदरखान हा बहलोलखानाचा सल्लागार होता.नेसरी येथील लढाईमध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर व बहलोलखानाचा यांच्यामध्ये लढाई झाली होती.पुढे वाचा

खिद्रापूरच्या इतिहासाच्या दृष्टीने शिलाहार राजे गंडरादित्य,विजयादित्य व भोज हे राजे अत्यंत महत्वपूर्ण ठरतात.गंडरादित्य (इ.स. 1105 ते 1140) या राजांनी धार्मिक लोकोपयोगी कामे केली आहेत यामध्ये अनेक हिंदू व जैन मंदिरे बांधली आहेत.गंडरादित्य नंतर विजयादित्य (इ.स.1140 ते 1175)  व त्यानंतर द्वितीय भोज (इ.स.1175 ते 1212) गादीवर आले.

खिद्रापूर मधील श्री कोपेश्वर मंदिर हे वास्तुकलेचा उत्तम असा नमुना आहे.मंदिरामध्ये अनेक देवतेच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात  या सर्व मूर्तींची माहिती आपण लवकरच घेणार आहोत.दर सोमवारी मंदिरामध्ये पालखी असते तसेच दर सोमवारी व महाशिवरात्री दिवशी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.मंदिर अभ्यासकांसाठी हे मंदिर खुप महत्वाचे आहे.गर्भग्रहामध्ये श्री कोपेश्वर व धोपेश्वर याचे स्वतंत्र लिंग पाहायला मिळेल.श्री धोपेश्वर बद्दलची एक कथा सांगण्यात येते कथा पुढच्या भागांमध्ये पाहनार आहोत.करवीरच्या अष्टलिंग यात्रेमध्ये आग्नियेचा श्री कोपेश्वर व दक्षिणेचा श्री वीरभद्रेश्वराचे स्थान आहे.या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांमध्ये नंदीचे दर्शन होत नाही.हा नंदी  खिद्रापूर पासून 26 किलोमीटर अंतरावर येडूर या गावामध्ये आहे.श्री वीरभद्र व भद्रकाली याची स्वतंत्र मंदिरे आपल्याला आज पाहायला मिळतात.श्री वीरभद्रेश्वराचे लिंग व श्री भद्रकाली दिवीेेची मुर्ती आहे.तसेच विरभद्र मंदिरापासून काही अंतरावर देवी सती बरोबर आलेला नंदी चे स्थान आहे.मंदिराच्या गर्भगृहामध्ये पाषाणातील भव्य नंदी आपल्याला दिसुन येतो.देवी सती व दक्षराजा कथा आपल्याला पुराणग्रंथामध्ये आढळते ती पुढील प्रमाने.

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

                ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणजे  दक्ष प्रजापती होय.दक्षाप्रजापती आणी प्रसूती यांची कन्या देवी सती तसेच याचबरोबर सत्तावीस नक्षत्र म्हणजेच जी 27 नक्षत्रे आहेत या सती च्या बहिणी व आणखी अठ्ठावीस कन्या या कश्यप ऋषींच्या पत्नी.देवी सती म्हणजे साक्षात जगदंबेचा अवतार. देवी सतीला लहानपणापासूनच श्री शंकराची ओढ.दक्षजापतीचा पिता ब्रम्हदेव व आराध्य विष्णू तर दक्षपतीला सती चे लग्न विष्णू बरोबर व्हावे असे वाटले परंतू शिवाची शक्ती ही शिवा कडे जाणार यामुळे,दक्षप्रजापतीने देवी सती चा विवाह श्री शंकराची केला परंतु दक्षप्रजापतीला शंकर हे जावई म्हणून पसंत नव्हते याचे कारन म्हणजे दुर्गासत्पशक्ती मध्ये सुंदर उल्लेख आहे.

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो

जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः ।

कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं

भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ।।

                  पुढे काही काळानंतर देव सभा बसवण्यात आली होती या सभेच्या मध्यस्थानी ब्रह्मा-विष्णु-महेश होते त्यावेळी प्रजापतीचे आगमन झाले.सगळे देवगण उभे राहिले अपवाद मात्र या तीन देवांचा.दक्षजापती चा असा समज झाला की ब्रह्मदेव माझे वडील आहेत,विष्णू हे माझे आराध्य आहेत परंतू श्री शंकरानी उभे राहायला पाहिजे होते असे दक्ष प्रजापती ला वाटले परंतु दक्ष प्रजापतीने असा विचार केला नाही की हे सृष्टीचे मालक आहे.दक्ष प्रजापतीने नात्याचा विचार केला त्यामुळे दक्ष प्रजापती ला अपमान झाल्यासारखा वाटला. म्हणून शंकराच्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून दक्ष प्रजापतीने ब्रहस्पती नावाचा एक यज्ञ आपल्या घरामध्ये ठेवण्यात आला.या यज्ञाला सर्व देवांना आमंत्रित करण्यात आली परंतु सती – शंकर या दोघांना आमंत्रण देण्यात आले नाही.नारदमुनींनी सती ला निरोप दिला की तुमच्या घरा मध्ये यज्ञ आहे तेव्हा सती नारदमुनींना म्हणाली की या यज्ञाबद्दल सांगायला विसरले असतील. त्यानंतर देवी सती यज्ञासाठी परवानगी घेण्यासाठी श्री शंकरा कडे जाते परंतु शंकर असे म्हणतात की सती ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण नाही त्यात ठिकाणी जाणे योग्य नाही.सती म्हणते आई-वडील,गुरु,देव यांच्या आमंत्रणाची वाट बघायची नसते तरी मला परवानगी द्या.त्यावेळी शंकर म्हणतात सती पुढे अनर्थ आहे.सती म्हणते पुढे काय अनर्थ आहे मला माहित आहे.त्यानंतर सतीने आपल्या दहा महाविद्या शिवशंकर यांना प्रकट करून दाखवल्या.यावेळी सती म्हणते तुमच्या मानाच्या प्रतिष्ठेसाठी मला या यज्ञाला गेलच पाहिजे,तेव्हा शंकर परवानगी देतात व जाताना तू नंदीला सोबत घेऊन जा असे सांगतात.नंदी व सती की दोघे यज्ञासाठी जातात तिथे पोचल्यावर सतीचे आई-वडील यज्ञास बसलेले असतात.देवी सती आलेले पाहताच सती कडे कोनी लक्ष देत नाही.यज्ञाभोवती सर्व देवगण,ब्रम्हदेव व विष्णूदेव असतात परंतु तिथे शंकराची अनुपस्थिती असते.या दृश्यामुळे सतीला खूपच वाईट वाटते.काही वेळा नंतर सर्वांच्या आहोती सुरू होतात.सर्व देवांच्या आहोती होतात,ब्रह्माच्या आहोती होते,विष्णूच्या आहोती होतात ज्यावेळी शंकराची आहोती होते त्यावेळी दक्ष प्रजापती म्हणतो की या आहोती द्यायची काही गरज नाही त्यावेळेस सती म्हणते का आहुती द्यायच्या नाहित,तुमचे जावई म्हणून नाही तर त्रिभुवनाचा कर्ता संहरता म्हणून या आहुती दिल्याच पाहिजेत.यावेळी दक्ष प्रजापती म्हणतो काय तुझ्या पतीचे ध्यान आहे चिताभस्म लावून फिरणारा योग्य तरी आहे का,गळ्यात नरमंडूणाच्या ची माळा घालणारा,हातात भिक्षापात्र घेऊन फिरणारा,असल्या या व्यक्तीला कशासाठी सन्मान द्यायचा.सती दक्ष प्रजापती ला म्हणते गुरुचा किंवा पतीचा जो कोणी अपमान करेल त्याचा शिरच्छेद करायचा तसेच त्या व्यक्तीची तोंड पाहू नये असा शास्त्रात नियम आहे,परंतु माझे दुर्दैव असे की हा अपमान करणारे माझे पिता आहेत.त्यामुळे माझ्यापुढे असा प्रश्न आहे की एक तर मी तुमचा शिरच्छेद केला पाहिजे किंवा माझा देह टाकला पाहिजे कारण असा विटाळलेला हा देह घेऊन मी शंकराकडे जाऊ शकत नाही,त्यामुळे मी तुम्हाला मारणार नाही.मी माझे शरीर संपवते असे असे म्हणून योगअग्नीतून कुंडलिनी जागृत करून सतीन स्वतःच शरीर भस्म केल.ही बातमी ज्या वेळी कैलासावर श्री शिवशंकरांंना कळते त्यावेळी श्री शिवशंकरांनी एक जटा तोडली व ती आपटली त्यामधून वीरभद्र व भद्रकाली प्रकट झाली.त्यानंतर शिवशंकर या दोघांना आज्ञा देतात की तुम्ही दक्ष प्रजापती कडे जाऊन तेथील सर्व यज्ञ विध्वंस करा.वीरभद्र हातामध्ये ढाल,तलवार,डमरू,त्रिशूळ,धनुष्य बान ही शस्त्रे घेऊन युद्धाला आला तसेच भद्रकालीच्या हातामध्ये शस्त्रे घेऊन सर्वकाही उध्वस्त केले.जे कोणी शंकराच्या अपमान करण्यात सहभागी झाले होते त्या सर्व देवांना शाप देण्यात आले.सर्वांना शिक्षा देण्यात आली व शेवटी दक्षप्रजापतीची मस्तक तोडून अग्नीत टाकण्यात आले.( याचे प्रतीक म्हणून गुग्गुळ काढण्यात येतो ).शंकर येतात सतीची ही अवस्था पाहून शंकराचा राग अनावर होतो.या रागाचे दैवत म्हणजे श्री कोपेश्वर.त्यानंतर शेजारी असलेले श्री विष्णू ( धोपेश्वर )  शंकरांना शांत करतात.सर्वजण म्हणतात सृष्टीला प्रजापती पाहिजे त्यानंतर प्रजापतीच्या अहंकाराचे प्रतीक म्हणून बकऱ्याचे मुंडक कापून प्रजापतीला लावण्यात आले. त्यानंतर दक्ष प्रजापती काशीमध्ये जाऊन तप केले व दक्ष प्रजापती शिव भक्त झाला.श्री शिवशंकर सतीचे हे शरीर घेऊन त्रिभवनामध्ये फिरू लागले.सृष्टीच्या  कोणत्याच कार्यामध्ये ते कुठेच भाग घेईनात.हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवून सतीच्या देहाचे 51 भाग केले,ज्या ठिकाणी या देहाचे भाग पडले त्या प्रत्येक ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झालीत.त्या ठिकाणी शिवशंकर भैरव रूपात राहून क्षेत्राचे रक्षण करतात.करवीर क्षेत्री सतीचे त्रिनेत्र पडले म्हणून श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आहे व रक्षनासाठी रंकभैरव आहेत.दरवर्षी या कथेची अनुभूती म्हणून होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येथे यज्ञ पेटवला जातो.मोठ्या प्रमानामध्ये यावेळी येथे भाविक येतात.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top