कागल तालुका ( 16° 30′ उत्तर, 74° 15′ पूर्व ) हा तालुका पुणे-बेळगाव रस्त्यावर कोल्हापूरच्या अग्नीयेस साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे.दूधगंगा नदीच्या उत्तरेस थोड्याच अंतरावर हे गाव वसलेले आहे. गावामध्ये 1892 साली जयसिंग तलावाची बांधनी करण्यात आली होती. या तलावापासून गावांमध्ये पाणीपुरवठा होतो.गावामध्ये जुन्या मशिदी व मंदिरांचा अवशेष आढळून येतात.या गावामध्ये सुंदर राम मंदिर आहे तसेच पंचतारांकित एमआयडीसी आहे.कागल तालूकामध्ये 84 गावांचा समावेश आहे.