हातकणंगले ( तालुका मुख्यालय 16° 45′ उत्तर 74° 15′ पूर्व ) कोल्हापूरच्या ईशान्सेस 21 किमी वर असुन कोल्हापूर – मिरज रेल्वे मार्गावरील स्थानक आहे.एका आख्यायिकेनुसार पूर्वी या गावातील एका व्यक्तीने उकळत्या तेलामध्ये आपले हात बुडवून आपन निष्पाप आहोत असे दाखविण्याचे दिव्य केले,त्यावरून या गावाला हातकणंगले नाव पडले अशी नोंद कोल्हापूर गँझेटिअर मध्ये आहे.हातकणंगले पासुन साधारन 9 किलोमीटर अंतरावर इचलकरंजी शहर आहे मोठ्या प्रमानात इथे सुत गिरण्या आहेत तसेच चांदीच्या उत्तम कलाकुसरीच्या दागिन्यांसाठी हुपरी हे गाव याच तालुक्यामध्ये येते.हातकणंगले मध्ये रामलिंग धुळोबा,चिन्मय गणपती,बाहुबली,कुंभोज,जैन मंदिर व गोरीसाहेब पीर दर्गा ही पर्यटन स्थळे आहेत.हातकणंगले तालूका मध्ये 59 गावांचा समावेश आहे.