कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ एक प्रचंड गणेशमूर्ती दिसते .पुण्याहून कोल्हापूरला जाताना टोप गावाजवळ हायवेपासून अंदाजे दिड किमी वर हा गणपती आहे हायवेवरून तो दिसतोच.चिन्मय मिशनने कर्नाटकातून ५० कारागीरांकडून १८ महीन्यात ही मूर्ती बनवून घेतली आहे.मूर्ती डाव्या सोंडेची आहे पुढचा उजवा हात वरदहस्त आहे .मागील उजव्या हातात अंकुश, मागील डाव्या हातात पाश व पुढील डाव्या हातात मोदक आहे.