आजरा हा तालुका ( 16° 05′ उत्तर, 74° 10′ पूर्व) या तालुक्याचे मुख्यालय मिरज-बेळगाव रेल्वे मार्गावरील घटप्रभा रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला 64 किलोमीटर अंतरावर आहे व संकेश्वर पासुन पश्चिमेला 38 किलोमीटरवर आहे. चित्रा व हिरण्यकेशी या दोन नद्यांच्या संगमाच्या वायव्येला असलेल्या सह्याद्रीच्या रांगेवर व रमणीय ठिकाणी हे गाव वसलेले आहे.गावात प्रवेश करताना व्हेक्टोरिया पुल आहे तसेच चित्रा नदीवर संताची पुल आहे.फणस,काजू,आंबे याची झाडे आपल्याला आढळतात.आजरा पासुन आंबोली घाटातून वेंगुर्ला जाता येते तसेच पुणे-बेळगाव रस्त्यावरून निपाणी व संकेश्वर या ठिकाणी देखील आजरा रस्त्याने जोडला आहे.आजरा गावाच्या शिवारात पिकनारा घनसाळ तांदूळ हा प्रसिद्ध आहे,अजूनही आजरा हे चांगल्या प्रतिच्या तांदळासाठी प्रसिद्ध आहे.हे गाव घोरपडे घराण्याच्या ताब्यात होते.आजरा येथे पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे रवळनाथ मंदिर रामलिंग किंवा रामतीर्थ यांची देवळे आणि पडका एक डोंगरी किल्ला होय.याच्या पश्चिमेस सुमारे 55 किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर चाळोबा चे देवस्थान असून येथे सायंकाळी वेंर्गोला च्या समुद्राचे दृश्य अतिशय सुंदर दिसते.तसेच चंदगड तालुक्यामध्ये बाँक्साइटच्या खानी आहेत.आजरा तालूकामध्ये 97 गावांचा समावेश आहे.