खाद्यसंस्कृती अनुभवा
महाराष्ट्रीय लोक मनापासून ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व पाळतात.म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणाऱ्या ब्रम्हदेवासमान आहे. तेथील माणसे अन्न सेवन करण्यापूर्वी ते देवाला नैवेद्य म्हणून कृतज्ञतेने अर्पण करतात.महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती मध्ये प्रामुख्याने कोंकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापुरी, खानदेशी, वऱ्हाडी असे पाच प्रकार आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील पाककृतींच्या संदर्भात प्राधान्याने नाव घेतले जाते ते कोल्हापूरचे.कोल्हापूर शहराला ऐतिहासिक,पारंपरिक असा समृद्ध वारसा आहे. झणझणीतपणा हे तेथील खाद्यसंस्कृतीचे प्रथम वैशिष्ट्य म्हणावे लागेल.खवय्यांसाठी कोल्हापुरी भोजन म्हणजे पर्वणीच असते.कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की झणझणीत तांबडा पांढरा रस्सा,मिसळ,भेळ,वाडीची बासुंदी व खवा व राशिवडे ची बर्फी ही ओळख समोर येते.