गिरगाव हे कोल्हापूर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. पाचगाव या गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर गिरगाव आहे. मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला आपल्याला गावाची प्रवेशद्वाराची कमान दिसते. गावाचे ग्रामदैवत हे श्री भैरवनाथ आहेत. या गावाला सैनिक गिरगाव असेही म्हणतात. कमानी पासून अवघ्या पाच मिनिटांमध्येच आपल्याला मंदिर दिसते. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर अशी चाफ्याची झाडे आहेत.चैत्र महिन्यामध्ये मंदिराचा परिसर खूप सार्या फुलांनी सजुन जातो.